|
महात्मा गांधींना माझी श्रद्धांजली
महात्मा गांधी एक असे नेते होते
ज्यांनी सत्याच्या आधारे जनतेचे नेतृत्व केले.
प्रथम स्वत: सत्याचे आचरण करून
नतंर दुस-यांना करण्यास सांगितले. ख-या अर्थाने ते
लोकांचे नेते होते. अहिंसेच्या
मार्गाने त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अग्नीला अग्नी विझवू शकत नाही
यावर त्यांचा विश्वास होता. शक्तिची स्पर्धा शक्तिबरोबर होत नाही. आग विझविण्यास
पाण्याचीच गरज भासते आणि आतंकवादाच्या अग्नीला वश करण्याकरीता अहिंसा निश्चितच
पाण्याचे काम करु शकते.
गांधीजींनी
फक्त भारतालाच नव्हे तर अनेक आफ्रीकन देशांना युद्ध न करता अहिंसेच्या मार्गाने
स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आज संपूर्ण जगाने हा अहिंसेचा विजय असल्याच मान्य केले
आहे.
मात्र आज
माझ्या स्वतःच्या भारत देशात हा अहिंसेचा झरा आटला आहे. आज आपण गांधींजींच्या
तत्वांची केवळ चर्चा करतो, जो नोबेल पुरस्कार गांधींना कधीच मिळाला नव्हता. माझ्या
मते पुरस्कार मिळविण्याच्या प्रयत्नांपेक्षा त्यांच्या नितिमूल्यांचे अनुकरण करणे
जास्त गरजेचे आहे. आज भारतीय राजकारणी व्यक्ति मिडीयाच्या सहाय्याने तीच जूनी, ‘फूट पाडा, आणि राज्य करा’,
या नितीचा वापर करीत आहे तर धर्म, जातीची विचारणा न होता, प्रत्येक नागरीक मग तो
“मुन्नर”
आहे, गुज्जर आहे, हिंदू आहे किंवा मुसलमान आहे हे नं पाहता, तो केवळ भारतीय आहे याच
“द्रष्टिने”
त्याचेकडे पाहिले पाहिजे.
आज शासनाला
स्वदेशी आंदोलनाचा विसर पडलेला दिसतो आहे. विकासाच्या नावावर ‘माँल्स’
उघडण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. शासनाला नव्यान ती जूनी आठवण करुन द्यावी
लागणार आहे काय? ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला
होता, आणि तब्बल १५० वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केल. आज तिच पुनरावृत्ती
होण्याची वेळ आलेली आहे. फक्त यावेळेस सामान्य माणूस आणि श्रीमंतांच राज्य राहिल.
जीवनमान उंचावेल आणि वाढतच राहिल. महागाईचा आलेख चढत्या स्तरावर जाईल. आणि आत्ता हे
सुरुही झालेले आहे. मागिल २-३ वर्षाच्या तुलनेत आज जमीनीची किंमत २०० ते ३०० पटीने
वाढलेली आहे.
शासनाने हि
परवानगी कां द्यावी? जमीन निर्माण केल्या जात नाही किंवा उत्पन्नही केल्या जात
नाही. मग तिचे दर कां वाढावे? आणि याला एकच कारण म्हणजे बिल्डर्सचा एकाधिकार. आज
छोट्या-छोट्या सामान्य बिल्डर्सच्या हातून हा व्यापार जावून मोठे मोठे भवन निर्माण
करणा-या अति श्रीमंत बिल्डर्सची हया क्षेत्रात मक्तेदारी झालेली आहे.
आणि हिच स्थिती माँल्स आणि
भाजी मंडईच्या संदर्भात सांगता येईल. शासनाचे म्हणने आहे माँल्स आणि माँल्स आणि
भाजी मंडई मुळे बेकारी निर्माण होईल याचे निदान काय? छोटे-छोटे विक्रेता, दुकानदार
बेरोजगार होतील यावर उपाय काय? शिवाय महागाई वाढेल आणि वाढतच राहिल.
सामान्य
माणसाची हि व्यथा पाहून महात्मा गाँधी आपल्या समाधीत दु:खी झाले असतील, रडले देखील
असतील, निश्चितच त्यांना चर्चिलचे शब्द आठवले असतील. चर्चिल म्हणाले होते, ‘भारताचे
नेते आपसात भांडतील आणि देशाला अनेक देशात विभक्त करतील.’
त्यांच हे कथन किती सत्य होतं, ह्याची आज प्रचिती येत आहे.
इंग्रजांना जे
काम करणे अशक्य होते तेच काम आज भारतीय स्वत: करीत आहे. हे कटूसत्य केवळ
भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला लागू आहे. आज कोणताही राजकीय नेता मानवता,
स्वायत्ता, जीवनावश्यक मूल्यें ह्यावर विचार करतांना दिसतो? माझ्या मते ‘अजीबात
नाही’ आज सर्व नेते मंडळींनी
देशावर बोलण्या पेक्षा, धोक्यात असणा-या मानवतेवर विचार करणे आवश्यक आहे.
न्यूक्लिअर बाँम्ब, भविष्यातला बाँम्ब नसून, पर्यावरणात होणारे बदल, ओझोनचा कमी
होणारा थर जागतिक तापमानात होणारी वृद्धि, याचच भविष्यात बाँम्ब मध्ये रुपांतर
होणार आहे. कारखान्याचा धूर, वाहनांचे प्रदूषण यामुळे पूर्वीपासून पर्यावणाचे
संतूलन बिघडले आहे. ज्याला आपण विकास म्हणतो तोच उद्याचा विनाश ठरेल हे निश्चित.
सुरक्षेवर खर्च होणारा सरकारी निधी सामान्य जनतेचा कल्याणावर खर्च व्हायला पाहिजे.
पर्यावरणामुळे निर्माण होणारा क्लाइमेटिक बाँम्ब, हवामानाचा हा बाँम्ब न्यूक्लिअर
पेक्षा कितीतरी पटीने जास्त हानीकारक आहे हे विसरता कामा नये.
सामान्य
माणसाचा अर्थ व्यक्ति विशेष नसून त्यांचे आत्मिक विचार, विचारांचे चैतन्य आहे. हेच
विचार ब्रह्मांडात भ्रमण करीत असताना कोणीतीरी ते हस्तगत केले आणि त्यालाच लोकशाही
हे नाव दिले. भारतात पूर्वीपासूनच एक आदर्श लोकशाही होती. खरे लोकराज्य होते ज्याला
आपण रामराज्य म्हणत होतो आणि ह्याच रामाराज्याची कल्पना महात्मा गांधीनीं केली
होती. जागतिक स्तरावर अशाच रामाराज्याची स्थापना करणे महात्मा गांधींच ध्येय होत.
श्रेष्ठ कवि नरसी मेहता ह्यांनी आपल्या कवितेत रामराज्याची व्याख्या अशी केली -‘वैष्णव
जन तो तेने कहिए जे पीड पराई जाणे रे’
आणि हीच कविता महात्मा गांधी नेहमी गात असत. याचाच अर्थ रामराज्य तेव्हाच येऊ शकते,
जेव्हा शासक सामान्य माणसाची व्यथा समजू शकतील, त्यांच्या वेदनेची जाणीव त्यांना
होईल.
संकेतस्थळाचे विकासक
नोवेसिस
टेक्नाँलाँजिज प्रा. लि. पुणे
|