विचार नाविन्य

  हेतु

  प्रकटीकरण

  श्रद्धांजली

  संमिश्र विचार

  अविस्मरणीय व्यक्ती

  संपर्क

 

एक शब्द, एक विचार, एक विधान,एक मंत्र जो धैर्य देतो तोच ईश्र्वर

एक गंध, एक दर्प, एक सुगंध जो धैर्य देतो तोच ईश्र्वर

एक नायक, एक मुर्ती, एक व्यक्ति जो धैर्य देतो तोच ईश्र्वर

कदाचित तोच शब्द, तेच विधान, तीच व्यक्ति सर्वांना धैर्य देत नसेल परंतु वेगवेगळे शब्द, वेगवेगळे विधान, वेगळी क्रिया, वेगळा गंध वेगवेगळ्या लोकांना दिलासा देत असेल. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ईश्र्वराला वेगवेगळ्या रूपाने, नामाने अळविले आहे. आपण अशा जगात राहतो जो सामाजिक घटकांनी जोडलेला आहे म्हणून स्वातंत्र्याचा मार्ग कठीण आणि खडतर आहे. आजच्या समाजाचा पसरण्यापेक्षा आकसण्याकडे, संकुचित होण्याचा कल आहे.या समाजाने काही चुकीची मुल्ये मानवी मनात रुजवली आहेत. ती माणसाला कमकुवत बनवतात. आजचा समाज माणसाला स्वतंत्र विचार करु देत नाही. जो स्वतंत्रपणे विचार करतो तो या समाजाचा नावडता होतो. इतिहासात डोकावले असता आपल्याला आढळून येईल, जे स्वतंत्र विचारांचे होते त्यांनीच समाज कल्याणाची कास धरली आणि तेच जग बदलू शकले. अशा लोकांनीच ईश्र्वराला जाणले आहे. स्वतंत्रपणे विचार करणे खूप कठीण आहे. यासाठी प्रचंड धैर्य लागते. जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे विचार करता तेव्हा तुम्ही एकाकी पडता. समाज तुम्हाला लांडगा ठरवून कळपा बाहेर काढतो. समाजातील घटकांना तुमच्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. त्यांना असे वाटते की प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करू लागला तर समाजाच्या ऐक्याला बाधा येईल. पण वस्तुस्थिती अशी आहे प्रत्येकाने स्वतंत्रपणे सारासार विवेक बुद्धीने विचार केला तेच समाज व्यक्तिगत, मानसिक, वस्तुनिष्ठ, आध्यात्मिक पातळीवर प्रगती करु शकेल. सर्व उच्च विचारांचे सृजन व्यक्तिगत स्वतंत्र विचारातूनच झाले आहे, सामुहिक चिंतनातून नाही. समाज स्वतंत्र्याबद्यल बोलतो पण स्वतंत्र विचाराला चालना देत नाही, वेळोवेळी विरोधच होतो. परंतु धैर्यशील विचारवंताना त्याची तमा नसते कारण ते चांगले जाणतात व्यष्टीविचारातूनच समष्टी विचार धारणा तयार होते. समाजाला वेगळे अस्तित्व नाही. वेगळी भूमिका नाही. आपण आहोत म्हणून समाज आहे.

     जगात चांगले किंवा वाईट असे काहीच नसते, असते ती फक्त क्रिया! चांगले किंवा वाईट हे प्रत्येकाच्या नजरेच्या रंगीत चष्म्यातून दिसणारी गोष्ट आहे. द्वैतातील समन्वयातुनच एकत्व साधते.

     प्रत्येक मानवी क्रीया हे विकासाचे पुढचे पाऊल आहे. विकास आणि क्रिया दोन्ही परस्पर पुरक आहेत. क्रियेशिवाय आकलन होत नाही आणि आकलनाशिवाय समग्र ज्ञान होत नाही. ज्ञानाशिवाय जागृती होत नाही. जागृतीशिवाय मनुष्य पशूवत वाटतो.

आपल्या धर्मात ईश्र्वरप्राप्ती चार योनमार्गाने साधते. ते असे,

1) राजयोग-ईश्र्वरप्राप्ती मनाच्या एकाग्रतेतून.

2) ज्ञानयोग-ज्ञानमार्गाने ईश्र्वरप्राप्ती.

3) कर्मयोग- विहित कर्मे निष्काम भावनेने करुन घेणे.

4) भक्तीयोग-प्रेम मार्गाने ईश्र्वर प्राप्ती करुन घेणे.

सुरुवातीला हे योगमार्ग वेगवेगळे आचरिता येतील. यातील कोणताही एक मार्ग निवडू शकतो, पण उत्तरोत्तर हे योगमार्ग एकमेकात मिसळल्याचे जाणवते. ज्ञानयोगात ज्ञान प्राप्तीने सुरुवात होते परंतु ज्ञान प्राप्ती होताच कर्ममार्गाचे महत्व कळते. ज्ञानमार्गी कर्माचरणाऩे ज्ञानात भर घालतो. क्रियेची परिणती परिणामात होते. याचा मन आणि भावनेवर परिणाम होतो. या सर्वांतून प्रेमाची महती कळते. प्रेमाशिवाय कर्म आणि ज्ञान व्यर्थ आहे. प्रेमातून शाश्र्वत सुख मिळते. जे राजयोगाचे उद्यिष्ट आहे. कर्म योगात देखील क्रियेतुन ज्ञान आणि ज्ञानातुन प्रेम याच पाय-या दिसतात.

     बरेच दिवस जीवन नीरस वाटत होते. साचलेपण आल्याचे जाणवत होते. परंतु आता उत्साही वाटते. मला माहित नाही मला जीवनात काय हवे आहे? जीवन काय आहे हे मी जाणत नाही. जीवनाचे उद्यिष्ट काय? योग्य अयोग्य कसे ठरवावे? हे सारे प्रश्न मला सतत भेडसावित आहेत. मला उत्तर शोधायचे आहे. मला वस्तुनिष्ठ प्रश्नात गुंतायचे नाही. मानवी मनासंबंधी जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की मानवी मन वस्तु प्रमाणेच सारख्या परिस्थितीत सारखेच वर्तन करते काय? अलिकडे मी चिंतेत होतो. परंतु आता चिंतामुक्त आहे. मी स्वस्थचित्ताने जीवनाचा विचार करु शकतो. मी जीवनाला घाबरत नाही. मी सर्व क्रियांच्या परिणामाला सिद्ध आहे. मला माझ्या मन, बुद्धीच्या निष्क्रियतेचा प्रचंड तिटकारा आहे. नेहमीचे नीरस वा रितिरिवाजांनी बांधलेले जीवन माणसाची जगण्याची जिज्ञासा मारते. माणसाला द्विधा मनस्थितीची सवय होते आणि यालाच तो जगणे समजू लागतो. जीवन म्हणजे काय हे कळेल काय? अनंताच्या आकलनातून हे जाणू शकतो. मला आजवर एकही माणूस भेटला नाही ज्याने योग्य आणि अयोग्य हे जाणले आहे आणि जगणे सुंदर कसे करावे हे तो सांगू शकेल. मी जगणे हे प्रयोग मानून, जे योग्य वाटेल ते आचरुन त्याचे परिणाम काय हे निरिक्षण करतो. परंतु हे प्रयोगही परिपूर्ण नाहीत. या प्रयोगातून माझ्या प्रश्नांची उकल होत नाही. हे प्रयोग माझ्या जीवनाला दिशा देऊ शकत नाहीत.

     पूर्वी मी ह्युमन डेस्टिनी नावाचे पुस्तक वाचले होते. निरिक्षणातील बदलाने घटनेकडे बघण्याची दृष्टी बदलू शकते. हा शास्त्रीय दृष्टीकोन मनाच्या बाबतीतही लागू होतो. मनाची दृष्टी बदलली की घटनाही बदलतात. प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असतो. दोन भिन्न व्यक्ती एकाच घटनेकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या पैलूंमुळे प्रत्येक क्षणाला व्यक्तीची घटनेकडे बघण्याची दृष्टी बदलू शकते. यावरुन मला जवाहरलाल नेहरुंनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडियातील एक वाक्य आठवते. ते म्हणतात, भूतकाळ मृत असतो. मला ते मान्य नाही. प्रत्येकवेळी इतिहास नव्याने सामोरा येतो. तो वर्तमानासोबतच असतो, वाढतो, व्यक्तिसोबत बदलतो. एवढेच नाही तर वर्तमान आणि भविष्काळ घडविण्यास मदत करतो.

(23-09-1972)

मला भावनांवर नियंत्रण करण्यास शिकले पाहिजे. सध्या जीवनाच्या या टप्प्यावर मला उमगले आहे की मनुष्य आपले नशीब स्वत: घडवतो. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या भावना, जाणिवा, विचार आणि कृतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रत्येक क्षणी हे सर्व तुमच्या नियंत्रणात ठेवले पाहिजे. स्वत:विषयीचा भावूकपणा तुम्हाला कणाकणाने उध्वस्त करतो. मी अनुभवातून शिकण्याचे स्वत:ला पूर्ण स्वातंत्र्य पूर्ण दिले अहे कारण अनुभवासारखा गुरु नाही. अर्थात यातून तुम्ही जीवनात खूप सारे शिकता. परंतु ब-याचदा स्वैराचाराचे शिकारही होऊ शकता. बेछूट वागण्याची सवय होते आणि नंतर त्या सवयीचे तुम्ही गुलाम होता. परिस्थिती पूर्वपदावर येणे फार कठीण जाते. अनिर्बंध वागणे देखील सुनियोजित असावे लागते. सारासार विचार न करता क्षणिक आवेगातून होणारी कृती पशूवत असते. स्वयंशासन अत्यंत आवश्यक आहे. सुख स्वप्रयत्नाने मिळविले पाहिजे. श्रीमंतालाच सर्वसंगपरित्याग शोभतो. निर्धनाच्या सर्वसंगपरित्यागाला मोल नाही. जर तुम्ही धुम्रपान केले नसेल, दारु प्याला नसाल, जुगार खेऴला नसेल, थोडक्यात तुम्हाला एकही व्यसन नसेल आणि तुम्ही स्वयंशासनाबद्यल बोलत असाल तर ते व्यर्थ आहे. लागलेल्या वाईट सवयीतून स्वत:ची सोडवणूक करणे याला स्वयंशासन म्हणतात. आधी सवयीचे गुलाम होऊन मग मुक्ति मिळवावी लागते. सदगुणी त्याला म्हणत नाही ज्याने कधीच वाईट कृत्याच्या आहारी जाऊनही प्रयत्न पूर्वक त्यातून बाहेर पडला आहे किंवा त्यावर नियंत्रण मिळविले आहे.

     मनुष्य स्वत:चे नशीब घडवतो तसेच तुम्ही घडवा. पशूला ते जमत नाही. स्वत:ची उन्नती करा, स्वत:वर अंकुश ठेवा. मदत घेऊ नका. लोक मदतीसाठी किंवा निरपेक्ष भावनेने मदत कधीच करत नाहीत. एकतर त्यांना मोठेपणा हवा असतो किंवा तुम्हाला छोटे ठरवायचे असते. तुम्हीही उठसुठ कुणालाही मदत करु नका. केल्यास वाच्यता करु नका. कोणासाठी कसलाही त्याग करु नका. त्याग हा सदगुण नव्हे. तुम्ही खरोखर कुणावर मनापासून प्रेम करत असाल तर त्याच्या कडून कसलीच अपेक्षा ठेवू नका. देवाण घेवाणीवर आधारलेले प्रेम म्हणजे व्यापार झाला. जग म्हणते त्याग करु नका, तुम्हाला  वाटते म्हणून त्याग करा.

(दि. 15-08-67)

आजची सकाळ खूप छान होती. हळूवार वारे वहात होते. ढगांच्या आड सूर्य लपला होता. अंधूक प्रकाश होता. पक्ष्यांची गोड किलबिल ऐकू येत होती. अचानक सूर्य किरण उधळीत आकाशात अवतीर्ण झाला, जसे एखादी अवगुंठित सुंदरी आपला बुरखा उघडून सौंदर्याचे दर्शन देते. पक्षी एक क्षण स्तब्ध झाले पुन्हा आनंदाने विहरु लागले. रात्रीच्या अंधाराच्या गर्भात दडलेल्या असंख्य गोष्टी लख्ख दिसू लागल्या.

(दि. 8-03-1969)

भय मानवाला देवत्वापासून दूर नेते. म्हणून भयावर विजय मिळवा आणि देवरुप व्हा.

(दि. 09-07-1969)

निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास परमेश्र्वराशी जवळीक जाणवते.

मला या क्षणी जगात एकही मानवतावादी राजकारणी दिसत नाही. सर्वजण देश, राज्य, समाज याच्याशी पक्षपात करतात. त्यानी मानवता गमावलेली आहे. मानवी हक्कांसाठी लढणारा समाज ही पक्षपाताने ग्रासला आहे. महात्मा गांधीसारखा नेता आज कोठेही दिसत नाही. गांधीजीनी प्रथम स्वत: कृती नंतर लोकांना उपदेश केला. ते अनुयायाच्या चुकीबद्यल स्वत: प्रायश्चित्त घेत असत.

पुण्याची रहदारी सुव्यवस्थित करण्यासाठी दंड न आकारता वाहनांच्या सर्व चाकातील हवा काढून टाकली पाहिजे. सरकारकरवी जरुरीपेक्षा जास्त कारदे बनविले जात आहेत. परिणाम स्वरुप ते नीट पाऴले जात नाहीत. नियम कमी करुन असलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोर होते की नाही ते तपासणे गरजेचे आहे. जेव्हा हेल्मेटसक्तीचा कायदा आला तेव्हा मला हसू आले. शासन रहदारीवर नियंत्रण करू शकत नाही, वाहने वाटेल तशी धावतात, लाल दिवा असताना देखील वाहने सिग्नल तोडून धावतात. अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण ते अशा लोकांना इजा करु शकतात जे नियमानुसार जात आहेत. हसू नको तर काय करु! जे दुस-याशी उपद्रवी आहेत त्याना शिरस्त्राण घालून वाचविण्यासाठी कायदे कशाला! सरकारी अधिका-यांनी सरकारी वाहनांच्या प्रदूषणाची पाहणी करावी. किती जणांकडे प्रदुषणाचा परवाना आहे ते तपासावे. पी.एम.टी.च्या कितीतरी बसेस धूर ओकतात. सरकार हे प्रदूषणाचा कसे रोखेल? जर अधिकारी विक्री कर कमी आकारत असेल तर त्याला वेळोवेळी सूचणा देऊन योग्य आकारणी करावयास सांगितली पाहिजे कारण तो सरकारच्या वतीने हे काम करतो. अधिका-यांना यासाठी कालावधी आणि कर आकारणी यांच्या सूचना वेळे आधी किंवा वेळोवेळी दिल्या पाहिजेत.

     धर्म आणि विज्ञानाचे मूळ एकच आहे. जसे स्वामी विवेकानंदानी सांगितले आहे. धर्माची उत्पत्ती दोन तत्वातून झली आहे. 1) निसर्ग पूजा 2) पूर्वज पूजा.

सर्व पूराणानी परमेश्र्वराला निसर्गाच्या विविध नावाने पूजले आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत वरुन, इंद्र, अग्नी वगैरे तसेच ग्रीक संस्कृतीत देवाचे नाव नैसर्गिक शक्तीतूनच पुढे आले आहे. झोरोस्ट्रीयन अग्नीची पूजा करतात. तर इजिप्शियन पूर्वजांचे मृत शरीर जतन करुन ठेवतात. त्याना पॅगोडा म्हणतात. आणि मृत शरीराला ममी म्हणतात. स्वामी विवेकानंदाच्या मते दोन्ही एकात मिसळू शकतात. अर्थात जे जाणिवांच्या पलिकडचे आहे ते ईश्र्वर निर्मित आहे असे मानावे. विज्ञानाचे मूळ ही याच तत्वावर आधारलेले आहे. माशांना पोहताना पाहून माणूस पोहायला लागला. याच तत्वावर आधारलेले बोटी आणि जहाजांची निर्मिती झाली. पक्षांचे उडणे पाहून विमानांचा शोध लागला. यावरून सिद्ध होते की विज्ञान आणि धर्माचे मूळ एकच आहे.

ह्युमन डेस्टिनी या ग्रंथाच्या लेखकाच्या मते विज्ञान दोन तत्वावर बेतले आहे.

1) विसंगतीतून सुसंगतीचा शोध 2) सूक्ष्म निरिक्षणातून अदभूत घटनांचा वेध घेणे. बॉईल्स लॉ, आर्किमिडिज तत्व पहिल्या प्रकारात मोडते. बॉईल्स लॉ तापमान स्थिर ठेवून घनता आणि दाब यातील बदलाचे स्वरुप अचूक सांगतो. परंतु तापमान बदलल्यास नियम बदलतो. अगणित घटक, बाबी, अगणित नियम या घटकांचे स्वरुप विषद करतील. कोणतीही वस्तू घ्या, उदा. ऍश ट्रे. तो प्लास्टिक वा धातूचा असू शकतो. निरिक्षणाची पातळी उंचावल्यास जाणवेल तो सूक्ष्म परमाणूंचा बनला आहे. तसेच सजीवांबद्यल म्हणता येईल. सजीव पेशी, मांस, हाडे रक्त, अशा असंख्य घटकांनी बनले आहे. व असंख्य घटकांनी जीवन बनले अहे.  ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगतो की ऊर्जा नष्ट होत नाही. तिचे एका रुपातून दुस-या रूपात परिवर्तन होते. उदा. गतिज ऊर्जा नष्ट होत नाही. तिचे एका रुपातून  परिवर्तन होते. उदा. गतिज ऊर्जा, स्थितज ऊर्जा चुंबकीय ऊर्जा.

यानंतर आईनस्टाईनचा नियम आला.

1)                 या नियमातून उर्जा आणि वस्तुमान यातील संबंधाचा उलगडा झाला. हाच सिद्धात हिंदू धर्माच्या पूनर्जन्म धारणेला लागू पडतो. जीव नष्ट होत नाही, त्याचे स्वरूप बदलते.

यापूर्वी मी भगवदगीतेतील श्लोकांचा संदर्भ दिला आहे की मी ब्रम्ह आहे. मी निर्माण वा नाश पावत नाही. तुम्ही अनंत आहात. जेव्हा शरीर धारण करता तेव्हा आकारात बद्ध होता. जाणिवांच्या मर्यादा, संघर्ष सगुणाला क्रमप्राप्त आहे. सर्व चेतना जागृत असुनही एका अदृष्य शक्तिच्या मदतीनेच तुमच्या क्रीया घडतात.

शास्त्रीयदृष्टया वस्तुवरील प्रकाश पटलावर परावर्तित होऊन प्रतिमा दिसते. डोळ्यांच्या पेशी ती माहीती मेंदूला पोचवतात. मेंदूत त्याचे विश्लेषण होऊन तुम्हाला वस्तू दिसते. तेच श्रवण, चव, गंध आणि स्पर्शाच्या बाबतीतही होते.

 

आता तुमच्या सर्वसंवेदना व्यवस्थित कार्य करीत अहेत तरीही विचारात मग्न असताना तुम्ही पाहू, ऐकू, स्पर्श अनूभूति, चव, गंध यापैकी काहीही अनुभवू शकत नाही. म्हणजेच या सर्वांहून वेगळी शक्ती या सा-यांच्या अनूभूतिसाठी आवश्यक आहे ती कोणती असावी बरे! तेच ब्रम्ह आहे.

तुम्ही निराकार आहात. जन्म घेताच साकार होता. निराकार होण्यासाठी पुन्हा संघर्ष सुरु होतो. हा संघर्ष म्हणजेच जीवन! खरंतर जग हे बंदिशाळा आहे. मृत्युनंतर निराकार बनता. मृत्यु ही मुक्ती आहे. म्हणून मृत्युचा दूखवटा न होता त्याचे सोहळे झाले पाहिजेत असे ओशो म्हणतात, स्वतंत्रेच्या संघर्षात अनेक थोर नेते जन्माला येतात. इतर देशांची मला माहीती नाही, मी भारताबद्यल बोलत आहे.

स्वातंत्र्य लढयाची प्रेरणा अमेरिकन स्वातंत्र्य लढयापासून मिळाली.

स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडात सर्व क्षेत्रात थोर व्यक्ति जन्माला आल्या. थोर संत, शिकागो सर्वधर्मपरिषदेत भाषणाने लोकप्रिय झालेल्य स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, याच कालखंडातले. मी अमेरिकेला आवाहन करतो कि त्यानी अशा सर्वधर्म परिषदांचे नियमित आयोजन करावे. वैश्र्विक विचार रुजण्यास याने खूप मदत होईल. थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस, सी.व्ही.रामन, थोर लेखक रविंद्रनाथ टागोर, प्रेमचंद, यांचा जन्म थोर समाज सेवक राजाराम मोहन रॉय, महान उद्योगपती टाटा, बिर्ला, थोर स्वातंत्र्यसेनानी महात्मा गांधी, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, जवाहरलाल नेहरु वगैरे नेत्यांना खास सुरक्षेची कधीच गरज पडली नाही. ते निर्भयपणे वावरले. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या एकमेव ध्येयाने ते प्रेरित झले होते. त्यांना कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा नव्हती. जवाहरलाल नेहरु व्यतिरिक्त कोणाचेही वारस राजकीय नेते झाले नाहीत. मला अजुनही काही नेते आठवतात जसे, जगजीवनराम, लाल बहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा आणि डॉक्टर आंबेडकर, जगजीवनराम आणि डॉ. आंबेडकर तळागाळातील समाजाचे नेतृत्व करीत होते. त्यावेळी आरक्षण नव्हते. ते सर्वजण स्वकर्तृत्वावर त्या पदाला पोहोचले होते. शिक्षणात, राजकारणात आणि नोक-यात आरक्षण नसावे. ते गुणवत्तेवर आणि कर्तृत्वावर प्राप्त झाले पाहिजे. जर सरकारला तळागाळातील लोकांसाठी, अल्पसंख्यांकासाठी खरोखर काही करायचे असेल तर त्यांना एस.एस.सीपर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे जेणेकरुन त्यांच्या कुटुंबावर भार पडणार नाही. परंतु वैद्यकीय वा अभियांत्रिकी क्षेत्रात आरक्षण ठेवता कामा नये.

     शिक्षण म्हणजे शिकणे व शिकल्याप्रमाणे काम करणे. पण हल्ली शिक्षण म्हणजे फक्त पैसे कमावणे झाले आहे. बिझिनेस मॅनेजमेंटमध्ये गुणवत्तेच्या आधारावर लाच न देता काम मिळवणे शिकवतात काय?

     निवडून येणा-या लोकप्रितिनधींनी फुकट काम केले पाहिजे. किंवा सर्वसामान्य माणसाप्रमाणे वेतन घेतले पाहिजे. निपक्षपातीपणे काम केले पाहिजे.

     जेव्हा पैशाच्या मोबदल्यात कामे केली जातात तेव्हा ती तितकी प्रामाणिकपणे होत नाहीत. वास्तविक पैसा हे कामाचे बक्षिस आहे.

     न्याय आणि शिक्षण आर्थिकदृष्टया सर्वसामान्याच्या आवाक्यात असले पाहिजे. मी न्यायाच्या खर्चिकपणाची कितीतरी उदाहरणे देईन.उदा. संजयदत्त, सलमान खान, राहूल महाजन यांच्यावरील खटले! न्याय विलंबाने म्हणजे न्याय नाकारणेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे न्यायाची किंमत. सामान्य माणुस इतका काळ प्रलंबित न्य़ायासाठी वेळ आणि खर्च करु शकतो काय !

     सामान्य माणसाने विचार करायला शिकले पाहिजे. बडे सितारे, नेते, खेळाडू जेव्हा आजारी पडतात, जखमी होतात, तेव्हा सामान्य जन त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्याप्रती या बड्या लोकांनी कृतज्ञता ठेवली पाहिजे परंतु पैसे कमावण्याच्या  हव्यासापायी हे बडया कंपन्याचे ब्रँड अँबॅसेडर बनतात. माल चांगला वाईट याची खातरजमा न करता खुशाल जाहीरात करतात. सामान्य जनता या सिता-यांच्या भूलथापाना बळी पडून महागड्या वस्तू खरेदी करते. मला सांगा कोण चांगले! तुम्ही की हे सितारे! जगातली गरीबी नष्ट होऊन समानता आल्याशिवाय दहशतवाद नष्ट होणार नाही, लोकात धर्मं, राष्ट्रीयता याची चिकित्सा न होता माणूस म्हणून सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.

अन्न वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा आवाक्यात आल्याशिवाय गरिबी नाहीशी होणार नाही. आजकाल या गोष्टि गरीबच नव्हे तर मध्यमवर्गियांच्याही हाताबाहेरच्या झाल्या आहेत. मागील वर्षभरात घरांच्या किंमती 100 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एका वर्षभरात घरांच्या किंमती एवढ्या कशा काय वाढल्या आहेत. जमीन तर एकाच वेळी खरेदी केली आहे. मजूरी, बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्या आहेत काय? जर मागणी आणि पुरवठा यावर किमती नियंत्रित असतील तर बिल्डर्स लोकांचे शोषण करीत आहेत. हे सरकारने त्वरीत थांबविले पाहीजे.

     नेत्यांची किंवा अभिनेत्यांची मोठमोठी पोस्टर्स लावून शहर सुंदर, हिरवेगार होणार आहे की त्यांच्या दर्शनाने पोट भरणार आहे! रहदारी नियंत्रित होणार आहे की शेतक-यांच्या आत्महत्या बंद होणार आहेत! उलट हे नेते तर स्वत:ची कमाई, सुरक्षा करण्यासच जनसेवा मानतात. हे उलट व्हायला पाहिजे.

काम, धंदा व्यवसायातील नैतिकता.....

प्रत्येक काम, व्यवसाय, धंद्याचे नीतिनियम असतात त्यास हिंदू धर्मात स्वधर्म म्हटले आहे. जेव्हा मी माझा व्यवसाय बंद केला तेव्हा हे संकेत स्थळ सुरु केले. धंद्यातील नीतिमत्तेच्या हासाने मी गुदमरु लागलो. मी धंदा का करतो हा प्रश्न मला अस्वस्थ करु लागला. लोक धंदा का करतात मला माहित नाही मी मात्र नोकरीच्या जोखडात अडकण्याऐवजी धंदा स्वीकारला होता. मी स्वत:ला प्रश्न विचारु लागलो कि पैसे कमावणे हेच जगण्याचे एकमेव उद्यिष्ट आहे काय? जगण्याचा उद्येश काय? या प्रश्नांनी घेरले असतानाच लेखणी थांबवली आणि टी.व्ही.लावला. परमेश्र्वराने मला धर्म, व्यवसाय, धंदा यांची नैतिकता शोधून दिली. टीव्हीवर बातमी होती गृहमंत्र्यानी कोकाकोलामध्ये कीटकनाशके असल्याचे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे. हे पाहून माझ्या मनात विचाराची श्रृंखला सुरू झाली. सामान्य माणसाचे या ठीकाणी काय झाले असते! त्याची मालमत्ता जप्त झाली असती व त्याला तात्काळ पोलीस कोठडीत डांबले असते.

     घरांच्या किमती 100 ते 150 टक्क्यानी वाढण्याचे कारण मी माझ्या बिल्डर मित्राला विचारले असता तो म्हणाला मागणी वाढल्याने काळ्या बाजारात दुप्पट किमतीला विकली जायची तेव्हा काळाबाजार करणा-यावर कठोर कारवाई होत होती. त्याला पोलीस पकडून न्यायाचे. खरंतर ही पण मागणी आणि पुरवठ्याचीच बाब होती. एकाच कारणासाठी एकाला पकडले जाते आणि दूसरा राजरोस मिरवतो. ही कसली लोकशाही म्हणायची!

     डॉक्टर आणि दवाखाने भरपूर बिल आकारतात. ते भरमसाठ चाचण्या आणि प्रयोगशाळेतील तपासण्या करायला लावतात. हा डॉक्टररचा धर्म आहे काय! ते कृत्रिम आधाराने रोगी जगवतात. रोग्याच्या मृत्यूनंतर माणूसकीही दाखवीत नाहीत. रोगी जगणार नाही हे माहीत असून कृत्रिम उपायानी जगवतात आणि त्याचेही पैसे कमावतात. पैसे देईपर्यंत मृत देह ताब्यात मिळत नाही. पदवी ग्रहण करताना घेतलेली शपथ हे कशी काय विसरतात !

     विक्रेते मालाच्या खरेदीच्या संख्येवर विक्रीची किंमत ठरवतात. 100 नगांची एक किंमत. 1000 नगांची एक सवलतीची किंमत, 100000 नग अजून स्वस्त! जितकी खरेदी जास्त तितकि किंमत कमी. किरकोळ खरेदीदारापेक्षा घाऊक खरेदी दाराला नफा होतो. हे विक्रेत्यासाठी ठीक आहे परंतु समाज आणि जगाला याचा तोटा होतो. अशा पद्धतीने नवीन आणि छोट्या धंदेवाल्यांना याचा तोटा होतो. किमती निर्मितीच्या खर्चावर आधारित असाव्यात. अनेकजण उत्पादनात रस घेऊन वस्तूंच्या किंमती कमी करण्यास मदत करतील. काळ्याबाजाराला आळा बसेल. अन्यथा मोठे मासे छोट्या माशांना सहज गिळंकृत करतील. तरुण पिढी उद्योगधंद्याकडे फिरकणार नाही.

३१/०७/२००७

महर्षि पतंजलि म्हणतात, आपण जे अन्न भक्षण करतो त्याचे मांस आणि रक्तात रूपांतर होते. त्याच प्रकारे आपण जे शिक्षण प्राप्त करतो, जे कांही शिकतो, ते कर्तव्यमूल्यांच्या, नितिमूल्याच्या रूपात आत्मसात केले पाहिजे. प्राचिन भारतात ऋषीमुनी विद्यार्थ्याना वनामध्ये, आश्रमात, गुरुकुलात शिक्षण देते असत. दैनदिन जीवनातील उदाहरणाद्वारे त्यांना विविध विषयांचे ज्ञान दिल्या जाई. लढवय्यांना युद्धातील रणनिती बरोबर निती मूल्येंहि झिकविल्या जात. उदाहरणार्थ, युद्ध फक्त दिवसाच केले जावे, रात्री नाही. तसेच नि:शस्त्र शत्रूंवर आक्रमण करु नये. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना घर-परिवाराप्रती कर्तव्याचे ज्ञान दिल्या जाई. आपले आई-वडील, मुले ह्यांच्या पालन पोषणाचे शिक्षण दिल्या जात असे. त्यांना व्यापार व त्या संदर्भातील नितीमत्ता शिकविल्या जात असे. परंतू हे सर्व ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला नं देता गुरु वेगवेगळ्या शिक्षणाकरीता त्यांची निवडक करीत असत. आणि संपूर्ण ज्ञान त्याच पारखलेल्या निवडक विद्यार्थ्यांना मिळे जो त्या संबंधित क्षेत्रात सतझिल आणि नितीमूल्यांवर श्रद्धा ठेवणारा असेल. त्यावेळेसचे शासनकर्ते राजे-महाराजे युद्ध कसे करावे योग्य शासन कसे करावे ह्याबाबत ऋषींच्या परामर्श घेत असत. कोणतीही समस्या त्यांच्या सल्ल्याने सोडवित असत.

महात्मा गांधी आधुनिक युगातील राजनेते आणि असे एकमात्र व्यक्ति होते, ज्यांनी प्राचीन भारतीय पद्धतीने ज्ञान प्राप्त केले होते. त्यांनी अहिंसेच्या शक्तिने सामान्य माणसात जागृती निर्माण करुन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकांनी गांधीजींचे म्हणणे नेहमीच मानले. कारण त्यांच्या बोलण्यात सत्यपणा होता. बोलण्यात आणि वागण्यात अंतर नव्हते. म्हणूनच हिच निती इतर देशांनी स्वातंत्र्य मिळविण्यात उपयोगात आणली.

आधुनिक युगात आम्ही कोणत्याही व्यवसायात नितिमत्तेच शिक्षण देत नाही. आज आपण विद्यार्थ्यांच्या चारित्र्याची पारख न करता ज्ञान वाटत सुटलो आहे. आतंकवाद केवळ अहिंसेच्या नितीनेच आपण थांबवू शकतो. आतंकवादाच्या मुळाशी अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या किंमतीत वृद्धि होणे, आणि ज्ञान प्राप्तीचा अभाव हेच कारण आहे. प्रत्येक व्यवसाय फक्त जास्तीत जास्त पैसा मिळविण्यात विश्वास ठेवतो. कदाचित त्यामुळेच आज आपल्याकडे असे एकही विश्वविद्यालय नाही जिथे कर्तव्यमूल्ये, नितीमत्ता शिकविल्या जाईल. आज शिक्षणाचा व्यापार झाला आहे. आजचे शिक्षण आपण पैशाने विकत घेऊ शकतो, आणि विकत घेतल्यावर ते कोणत्या प्रकारचे आहे हे आपल्याला सहज समजू शकते. अधिकांश देश लोकतांत्रिक असल्याचा दावा करतात. परंतू वास्तविक कोणत्याही देशात लोकशाही नाही. कोणीही सामान्य माणसाचा विचार करीत नाही.

२७/१०/२००७

जेव्हा हि वेबसाइट आरंभ केली, त्या वेळेस ह्या वेबसाईटच्या उद्देश्याबद्दल माझ्या डोक्यात एक अस्पष्टशी, धूसरशी कल्पना होती त्यावेळी माझ्या मनांत जे काही आल ते मी कागदावर उतरवत गेलो.

आता माझ्याकडे वेबसाईटचा उद्देश एकदम स्पष्ट आहे, तो हाच की, सामान्य माणसात जागृती आणणे त्यांच्यात हि समज निर्माण करणे, कि जग एक आहे. आणि जगातील सर्व माणसें समान आहेत.

त्यांना हे कळायला हव की जगातल्या कोणत्याही राजकारणी व्यक्तिला जनतेबद्दल आस्था नाही, कळकळ नाही. फक्त पैसा आणि सत्ता त्यांच सर्वस्व आहे. जर खरंच त्यांना जनतेप्रती आपुलकी असती तर त्यांनी जनते विरोधी नितीचा अवलंब केला नसता. आणि त्यांना सुरक्षेची गरज ही भासली नसती. ते स्वत:ला लोकशाहीचे उपासक समजत असले तरी लोकशाही कुठेच नाही असती तर वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे नसते.

लोकशाहीचा अर्थ, जनतेचे, जनतेसाठी, जनतेने चालविलेले शासन नेत्यांच जीवन आपल्या पिढीला एक आदर्श म्हणून असायला पाहिजे, त्यांच उत्पन्न जनतेच्या सरासरी उत्पनाइतकच असायल पाहिजे. ज्यांना मानवतेवर विश्वास आहे त्यांनाच निवडणूकीसाठी उभ राहण्याचा अधिकार असावा. नेत्यांच्या वेतन भत्यांवर मर्यादा असावी.

वेगवेगळ्या बँकांचे अग्रीमेंट, करारपत्र एकसारखेच असावे.

ह्या वेबसाईटच्या माध्यमानें मला जे व्यक्त करायचे होते ते मी केले. आता ही युवा पिढीची जवाबदारी आहे की त्यांनी जगात लोकशाही आणण्याच्या पद्धतीवर विचार करावा.


संकेत स्थळाचे विकासक नोवेसिस टेक्नाँलाँजिज प्रा. लि. पुणे