विचार नाविन्य

  हेतु

  प्रकटीकरण

  श्रद्धांजली

  संमिश्र विचार

  अविस्मरणीय व्यक्ती

  संपर्क

 

मी ब्रह्म आहे म्हणून,
या शरीरातील चेतनतत्व अविनाशी आहे.
मी चिरातन सत्य व आनंदस्वरुप आहे.

हे भगवदगीतेतील श्लोकाचे भाषांतर आहे.

सत्यम् शिवम् सुंदरम्

हे संस्कृत भाषेतील प्रसिध्द सूत्र आहे.

सत्यमेव जयते

हे माझ्या भारत देशाचे घोष वाक्य आहे.

सत्यम् शिवम् सुंदरम् चा अर्थ सत्य खडतर आहे, परंतु सुंदर आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे विजय सत्यात आहे. परंतु एकही धर्मगुरू वा राजकारणी या सत्याची वाच्यता करीत नाही आणि म्हणून धर्मगुरू राजकारण्यांवर टीका करीत नाहीत. मला या विचारांचे लेखणी वाटे संशोधन करावेसे वाटते. मी याला संशोधन म्हणतो कारण हे विचार सर्वाना माहित आहेत. परंतु कोणीही यावर प्रकट भाष्य करीत नाही. जसे सफरचंद झाडावरून पडताना सर्वानी पाहिले असले तरीही न्युटनच्या नियमांचा विचार कोणीही केला नाही म्हणून न्युटनचा नियम जरी शास्त्रीय नियम असला तरी ते ही एक संशोधन आहे.

माझे पहिले संशोधन म्हणजे राजकारणी आणि दहशतवादी एकाच माळेचे मणी आहेत.

  1. मी याला माझे पहिले संशोधन म्हणतो कारण या संशोधना पाठोपाठ मला याचा भक्कम पुरावा ही मिळाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तान आणि इराक वरील हल्ला प्रभूच्या आज्ञेने केल्याचे सांगितले. दहशतवादी, त्यांचा जिहाद अल्लाच्या आज्ञेनुसार होत असल्याचे सांगतात. यावरून आपल्या नक्कीच लक्षात येईल दहशतवादी आणि राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत.
  2. मुलांना खिलाडूवृत्ती शिकवली पाहिजे, आक्रमक वृत्ती नव्हे. जोपर्यंत आक्रमक वृत्तीला खतपाणी घातले जाते आणि या वृत्तीचा प्रसार होतो आहे तोपर्यंत दहशतवादावर भाष्य करण्यात काहीच अर्थ नाही. खेळ खिलाडी वृत्तीने खेळले गेले पाहिजेत, त्वेषाने नव्हे. सगळी प्रसारमाध्यमे खेळात हरण्याचे कारण आक्रमक वृत्तीचा अभाव असे सांगतात. खेलाडूंना आणि मुलांना आक्रमक वृत्ती अंगी बागविण्याची आपण पहिली शिकवण देतो. कृपा करून असे लिहिणे आणि सांगणे थांबवा. मुलांना खेळाचा मनसोक्त आनंद घेऊ दे. त्याचबरोबर त्यांच्यात खिलाडूवृत्ती येऊ द्यात. तुम्ही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंचे कधी पाहिलेत? त्यांचे चेहरे पहा! जेव्हा त्यांना विकेट वा गुण मिळतो किंवा लक्ष्य साधते, त्या चेह-यावरचे भाव एखाद्या दहशतवादी वा खुन्याप्रमाणे असतात. चला आपल्या मुलांना खिलाडू वृत्ती शिकवू.

  3. आजची प्रसारमाध्यमे छोट्या मनांचे प्रतिनिधित्व करतात. या वक्तव्याची पुष्टी करण्यासाठी मी नाथानी स्टील यार्डच्या जाहिरात फलकाचा संदर्भ देतो. या जाहिरात फलकावर लिहिले आहे की,
    उदात्त मने योजनांविषयी बोलतात,
    सर्वसामान्य मने घटनांविषयी बोलतात,
    छोटी मने माणसांविषयी बोलतात.
    कोणतेही वर्तमानपत्र उघडा त्यात ते माणसांचीच चर्चा करतात. परंतु समस्या निवारण्यासाठी घटना वा योजनांची चर्चा आढळत नाही.

  4. या घडीला जगात मला कुणीही नेता दिसत नाही. खरतर नेत्यांना सुरक्षेची गरज नसते. असा एकही नेता सुरक्षा रक्षकांच्या ताफ्याशिवाय फिरताना आढळत नाही. आणि जेव्हा भ्य़ाड व्यक्ति तुम्ही नेता म्हणून निवडून देता तेव्हा त्यांच्याकडून कसल्या सरकारची अपेक्षा ठेवता? नेत्याची उक्ती कृतिप्रमाणे असली पाहिजे आणि तो बोले तैसा चाले असे वागणारा, धाडसी असला पाहिजे. असा एकमेव नेता माझ्या मनात येतो तो म्हणजे महात्मा गांधी, ज्यांनी अहिंसेची शिकवण लोकांना देताना ती सर्वस्वी अंगी बाणविली. त्यांनी कधी सुरक्षा रक्षकाची मागणी केली नाही.

  5. राष्ट्रीय सुरक्षा संघ स्वतःला लोकनियंत्रित व समतानिष्ठित समजतो. परंतु मला तसे वाटत नाही. कारण तसे असते तर त्यांनी विशेषाधिकार पाच देशांनाच दिला नसता.

  6. ब्रँड अँबैसेडरने जाहिरात केलेला माल वापरू नका कारण एकतर तो स्वतःच्या गुणवत्तेवर विक्रिच्या लायकीचा नसेल किंवा निर्मात्याला करेदिवरिल नफा ग्राहकाला देण्यात स्वारस्थ्य नसेल. भले तो नफा ब्रँड अँबैसेडरला गेला तरी चालेल.

  7. अमेरिका जगातील देशांना व्यापाराची क्षेत्रे खुली करावयाचे आवाहन करते परंतु थोडे पुढे जाऊन सीमा खुल्या करण्यास सांगत नाही.

  8. असे कोणतेही प्रजासत्ताक राष्ट्र जगात नाही जे प्रजेचे, प्रजेने चालविलेले वा प्रजेकरिता चालते. तसे असते तर सामान्य जनांना या नेत्यांचा वा बड्या धेंडांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तास न तास वाहतुकीमध्ये ताटकळत उभे रहावे लागले नसते. शिस्तीने वाहतुकीचे पालन करणा-या प्रजेला थोपवून या नेत्यांना वा बड्या धेंडाना रस्ता खुला करून देण्याचा हा अधिकार त्यांना प्रजेने कधीच दिला नसता.

  9. शिक्षणात  तर जवळजवळ सर्वच चुकीचे आहे. सध्याच्या शिक्षणपध्दतीत आपण मुलांना कसा विचार करावा हे शिकवत नाही तर काय विचार करावा हे शिकवतो. हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांनी स्वतः विचार करून चांगले किंवा वाईट ठरविण्याचे स्वातंत्र्य आपण त्यांना दिले पाहिजे.

  10. माझ्या मते भली मणसे सामान्य जनसमुदयातच आढळतात. थोडक्यात काय हिरो झिरो आहेत अन् झिरो हिरो आहेत. जगात खूप कमी सुशिक्षित आढळतील, साक्षर खूप आहेत पण सुशिक्षित नाहीत.

  11. शिक्षण म्हणजे जे काही थोडेसे तुम्ही जाणता त्याचा सर्वोत्तम उपयोग करणे. स्थापत्य अभियंत्याने चांगले रस्ते बांधले पाहिजेत. पण असे किती चांगले रस्ते आढळतात! हे सारे स्थापत्य अभियंते शिकलेले आहेत. चांगले रस्ते कसे बनवावयाचे हे ही ते जाणतात. तरीही त्यांच्या हातून अपेक्षित कार्य घडत नाही. सर्व महामार्ग सुस्थितीत ठेवले जातात कारण त्या रस्त्याने अति महत्वाच्या व्यक्ति, मंत्री आणि परदेशी पर्यटक जातात. शहरातील रस्ते सुमार असतात. चांगले रस्ते राखण्याची जबाबदारी सन्माननीय मंत्रीमहोदय, नगरसेवक घेतील काय? चांगल्या रस्त्यांच्या बांधणीसाठी संबंधितांना जाब विचारला पाहिजे. अलिकडे सरकारी अधिका-यांनी अनधिकृततेच्या नावाखाली ब-याच इमारती पाडल्या. यात सामान्य माणूस भरडला जातो, जो अशा इमारतीत घर घेतो. कारवाई व्हायचीच असेल तर ती बिल्डर वा अशा इमारतींना परवानगी देणा-या अधिका-यांवर व्हायला हवी आणि त्यांच्याचकरवी यात भरडले जाणा-यांना नुकसान भरपाई मिळायला हवी. साबाधित बांधकाम व्यावसायिक आणि त्याला पाठीशी घालणा-या महापालिकेवर कारवाई व्हावयास हवी आणि त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करून ती यात शोषण होणा-या घटकांना द्यावी.

  12. न्याय सर्वांना सहज सुलभ उपलब्ध व्हावा. कायद्याची मदत घेणे सामान्यानाही आर्थिकदृष्या सहज शक्य व्हावे.

  13. पैसा हा व्यापारात देवाण घेवाणीचे सहज सुलभ माध्यम म्हणून चलनात आला. परंतु  आज पैसा हे शक्तिकेंद्र बनले आहे. लोक विसरले आहेत कि ते पैसा बनवतात त्यांना पैसा बनवित नाही.

  14. जगात बोकाळत असलेली पेटंट प्रथा हा तर बौध्दिक भ्रष्टाचार आहे. पूर्वी कुणी पेटंट घेत नव्हते. उलट दुस-याने आपले अनुकरण केले तर अभिमानच वाटायचा.

  15. आम्ही काँलेजात असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर बोलत असू पण अजकाल कोणी या मुल्यांवर बोलत नाही. कोणत्याही लोकशाहीत नेत्यांना खास वागणूक दिली जात नाही. घटनेने प्रत्येकाला समान दर्जा दिला जावा असे नमूद केले आहे. बाकीच्या देशांबद्दल मला माहित नाही परंतु आमच्या देशांत नेत्यांना प्राधान्यक्रम दिला जातो. वाहतुक पोलिस रस्त्यावरील रहदारी थांबवून नेत्यांना प्रथम जाऊ देतात. हे तात्काळ थांबले पाहिजे. निष्कारण थांबावे लागल्याने, सामान्यांचे लाखो रूपयाचे पेट्रोल यांच्या फाजील लाडापायी वाया जाते. या मंत्रीमहोदयांच्या आगमनामुळे रहदारीत खोळंबल्याने  मला ४४ रूपयांऐवजी ६० रूपये रिक्षाला द्यावे लागले. असा प्रत्येकाला पडणारा भूर्दंड मोहून पहा! सामान्यांना नेत्यांमुळे नुकसान सोसावे लागते. वाहतुक पोलिसांवर पडणारा कामाचा ताण वेगळाच! हे खासदार, आमदार, मंत्री, वीज बिल, दुरध्वनी बिल वेळेवर कधीच भरत नाहीत, मुदत संपल्यावर शासकीय निवास रिकामे करीत नाहीत. त्यांचावर तातडिने कारवाई व्हायला हवी. त्यांनीही या सर्व बाबींची वेळेवर पूर्तता करून आदर्श वर्तवणुकीचा नमुना प्रजेपुढे ठेवावा. निवडणूकीला उभे राहणा-याने आपल्या मालमत्तेचा तपशील अचूक आणि तंतोतंत भरावा. प्रजेचाही यावर वचक असायला हवा आहे. राज्य व केंद्र शासनाच्या अधिवेशनाच्या काळात सभागृहात या लोकप्रतिनिधींचा किती धुमाकुळ चालतो! हा जनतेच्या पैशाचा अपव्यय नव्हे काय! कामकाजात व्यत्यय आणणा-या लोक प्रतिनिधींवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. हे न आवरल्यास कठोर शिक्षा, ज्यात संश्रम कारावासाची तरतूद असायला हवी. हे न आवरल्यास कठोर शिक्षा, ज्यात सश्रम कारावासाची तरतूद असायला हवी. सामान्य जनतेनेही अशा लोक प्रतिनिधींना जाब विचारावयास सज्ज झाले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपले अधिकार जाणून घ्यायला हवेत.

  16. बँका कर्ज वाटप करताना ग्राहकाला भरपूर कागदपत्रे जमा करण्यास सांगतात. तसेच संरक्षण त्या ग्राहकांना का देत नाही?

  17. भरमसाठ कागदपत्रांची मागणी करणा-या बँक प्रशासनाने ग्राहकाला दिलेले चेकबूक तो नीट वापरतो की नाही हेही पाहिले पाहिजे. चेक बाऊन्स होण्यावर कठोर उपाययोजना केली पाहिजे. पहिल्यांदा चेक बाऊन्स झाल्यास १०० रू. दंड आकारणी व्हावी, दुस-यांदा चेक बाऊन्स झाल्यास ५०० रू दंड आकारावा हे पुन्हा घडल्यास सरळ खाते गोठवावे.

  18. सरकारने सदनिका खरेदीकरणारे आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात विहित नमुन्यातील करारनाम्याची तरतूद करावी ज्यात दोन्ही पक्षाचे हित असले पाहिजे. तो एकतर्फी असता कामा नये.

  19. शासनाने सर्वांसाठी समान धोरण राबविले पाहिजे. कायद्याची अंमल बजावणी मानवी दृष्टीकोनातून व्हायला हवी. कायदे विशिष्ट जाती धर्मांचे लांगूलचालन करणारे नसावेत.

  20. अमेरिका स्वतःला जगातील एक महत्वपूर्ण लोकशाही प्रधान देश मानते. त्या देशाने प्रत्येकाचे विचार आणि वक्तव्य स्वातंत्र्य मानले आहे परंतु हे विचार त्यांच्या देशापुरते सिमित आहेत. त्यांची लोकशाही फक्त अमेरिकेपुरतीच मर्यादित आहे काय? स्वातंत्र्य फक्त त्यांच्या देशापुरते मर्यादित नसून सर्व देशांसाठी सारखे असले पाहिजे. अमेरिकेत बंदी असलेले औषध त्यांच्या देशातून बाहेर विक्रीस जाता कामा नये. वैश्र्विक शांतता वसुधैव कुटुंबकम् विचार धारेतूनच अस्तित्वात येऊ शकेल. अमेरिकेने सर्वांसाठी सारखे नियम ठेवले पाहिजे. क्षेपणास्त्र बंदीची सुरूवात अमेरिकेपासून झाली पाहिजे अन्यथा तोंडी समानतेला काहीच अर्थ नाही.

    बाबरी मशिद पाडविल्या दिवसापासून मी धर्म आणि राजकीय घडामोडींचा बारकाईने विचार करीत आहे. सर्व राजकीय नेत्यांनी जनतेला एकच आवाहान करायला हवे होते मशीद, देऊळ किंवा चर्चची नासधूस करता येणार नाही. ही सर्व ठिकाणे धार्मिक आहेत. बाहेरचा ढाचा बदलू शकता. लोकांच्या भावनेला इजा पोहचवता येणार नाही. मतांच्या आकड्यांवर डोळे ठेवून वावरणा-या राजकारण्यामध्ये हे नैतिक धैर्य बिल्कुल आढळत नाही. आज जर महात्मा गांधी असते तर त्यांनी ही भूमिका नक्की मांडली असती.

    जेव्हा मुंबईत महापूराने थैमान घातले तेव्हा एकही राजकारणी वा मान्यवर मदतीसाठी धावले नाहित. या आणिबाणीच्या प्रसंगी सामान्य नागरिकांनी एकमेकाला मदत करून माणुसकिचे दर्शन घडविले आणि स्थिती पूर्वपदावर आणली. लोकांनी आता सावध झाले पाहिजे. राजकारण्यांच्या मधाळ बोलण्याला, भूलथापांना न बुलता एकमेकात सलोखा, भाईचारा ठेवला पाहिजे. सामान्य जनतेने आता ठरविण्याची वेळ आली आहे की खरोखर त्यांचा नेता कोण आहे! जनतेने सारासार विवेक बुध्दीने मतदान केले पाहिजे. सत्य कठिण आहे पण सुंदर आहे. सामान्य माणसाने मत देताना उमेदवाराचे समाजातील स्थान वा त्याने दिलेली लाच पाहू नये. त्याचे चारित्र्य, कर्तृत्व महत्वाचे आहे. मतदार खरेदी करता येत नाही हे सत्य उमेदवाराला कळाले पाहिजे. आपला उमेदवार प्राप्तिकर विवरण नीट भरतो कि नाही यावर मतदारानी लक्ष ठेवले पाहिजे. नसल्यास समुहासमुहातून त्याला मत न देण्याबद्दल जागृती निर्माण केली पाहिजे. परिसरातील सार्वजनिक बांधकामावर जनतेने लक्ष ठेवले पाहिजे ते मुदतीत व ठरलेल्या प्रकारे होते की नाही याची खातरजमा केली पाहिजे. जर होत नसेल तर त्याच्यावर कारवाईची मागणी केली पाहिजे.


संकेतस्थळाचे विकासक  नोवेसिस टेक्नाँलाँजिज प्रा. लि. पुणे